घरमहाराष्ट्रत्यांचा आम्ही दोनदा 'खुळखुळा' केला म्हणत अरविंद सावंतांची नारायण राणेंवर सडकून टीका

त्यांचा आम्ही दोनदा ‘खुळखुळा’ केला म्हणत अरविंद सावंतांची नारायण राणेंवर सडकून टीका

Subscribe

त्यांचे चिरंजीव आणि ते स्वत: पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काही नैतिक अधिकार आहे का?” असा प्रश्न सुद्धा खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच एकमेकांवर टीका टिप्पणी करताना पायाला मिळतात दरम्यान केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी नुकतंच शिवसेनेबाबत एक मोठं विधान केलं होतं यावरूनच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नारायण राणे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

‘2024 मध्ये मुंबईत शिवसेनाच एकही खासदार निवडून येणार नाही असं विधान केंदीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. राणेंच्या याच विधानाचा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विशेष समाचार घेतला. नारायण राणेंचा आम्ही दोनदा ‘खुळखुळा’ केला. त्यांनी स्वतःचा विचार करावा असं खासदार अरविंद सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

“मला असं वाटतं की, त्यांच्यावर काहीही भाष्य करू नये. अगदीच दुर्लक्ष केलंय, असं वाटू नये म्हणून एवढंच सांगतो की, त्यांनी स्वत:चा विचार करावा. आम्ही त्यांचा दोनदा ‘खुळखुळा’ करून ठेवला आहे. त्यांचे चिरंजीव आणि ते स्वत: पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काही नैतिक अधिकार आहे का?” असा प्रश्न सुद्धा खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

याचसंदर्भांत खासदार अरविंद सावंत पुढे म्हणाले, “ज्या लोकांना स्वत:चं बूड नाही. अशा लोकांची दखल कशासाठी घ्यायची?. त्यांनी 50 पक्ष बदलले आहेत. आधी शिवसेनेत होते, मग स्वाभिमानी पक्ष काढला. पुढे स्वाभिमान पक्ष गहाण ठेऊन काँग्रेसमध्ये गेले. मग स्वाभिमानी पक्ष बंद करून भाजपात प्रवेश केला. हा प्रवास करणाऱ्या माणसाची नीतिमूल्ये काय आहेत? आणि त्यांचं नैतिक अधिष्ठान काय आहे? त्यामुळे नीतिमूल्ये आणि नैतिक अधिष्ठान नसलेल्या लोकांच्या कोणतेही भाष्याची माध्यमांनीही दखल घेऊ नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे” असं ठाकरे गटाचे खासदार पूरवनी सावंत म्हणले.

- Advertisement -

हे ही वाचा – इतिहास उघडून बघा, पवारांजवळ गेलेले सगळे पक्ष संपले; विजय शिवतारेंचा गंभीर आरोप

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -