घरताज्या घडामोडीWater Crisis In Marathwada : मराठवाड्यात पाणीबाणी; गतवर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी...

Water Crisis In Marathwada : मराठवाड्यात पाणीबाणी; गतवर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी घट

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. एकिकडे अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले तर, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.

मराठवाडा : मागील काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. एकिकडे अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले तर, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. विशेषत: मराठवाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय, उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. (Water Crisis In Marathwada water storage decrease in marathwada vidarbha konkan west maharashtra)

राज्यातील पाणीसंकट अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि नागपूर या भागांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, कोकण आणि विदर्भातील परिस्थिती काहीशी ठीक आहे. विशेष म्हणजे धरणातील पाणीसाठाही कमी होताना पाहायला मिळत आहे. गतवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने मराठवाड्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे पाणीटंचाई तर, दुसरीकडे दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिले आहे.

- Advertisement -

शतकऱ्यांप्रमाणेच जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी अनवाणी पायी फिरण्याची वेळ या भागांतील महिलांवर आली आहे. उजनी धरणात 0 टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता. सध्यस्थितीत कोयना धरणात 42 टक्के, खडकवासला धरणात 55 टक्के पाणीसाठा आहे. तसेच, लातूर, धाराशिव आणि बीडमधील धरणांमधील पाणीसाठ्यातही कमालीची घट झाली आहे. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामधील धरणांमधील परिस्थिती भीषण परिस्थिती होती.

राज्यातील पाणीसाठ्याबाबत माहिती

  • जायकवाडीतील धरणसाठा 16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी याच काळात जायकवाडीत 52 टक्के पाणीसाठा होता.
  • मराठवाड्यात गतवर्षी 42 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा फक्त 16 टक्क्यांवर आला आहे.
  • उत्तर महाराष्ट्रात गतवर्षी 50 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा 25 टक्क्यावर आला आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रात गतवर्षी 39 टक्के असलेला पाणीसाठा यंदा 31 टक्क्यांवर आला आहे.
  • कोकण आणि विदर्भातील पाणीसाठ्याची परिस्थिती तुलनेने बरी आहे.
  • कोकणात गतवर्षी 49 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा धरणांमध्ये 47 टक्के पाणीसाठा आहे.
  • पश्चिम विदर्भातील अमरावती भागात 47 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी 49 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
  • नागपूर विभागात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा 44 टक्के धरणांमध्ये जलसाठा होता.
  • पुण्यातील खडकवासला धरणात 55 टक्के पाणीसाठा होता.
  • जायकवाडीतील धरणसाठा 16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गतवर्षी या कालावधीत जायकवाडीत 52 टक्के पाणीसाठा होता.

हेही वाचा – Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

- Advertisement -

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -