घरमहाराष्ट्रमुंबईकरांवर पाणी संकट! उद्या 'या' भागात 24 तास पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांवर पाणी संकट! उद्या ‘या’ भागात 24 तास पाणीपुरवठा बंद

Subscribe

त्यामुळे कुलाबा, सँडहर्स्ट रोड, भायखळा, परळ आणि माटुंगा, वडाळा यासह सायन परिसरात 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, या काळात परळ आणि सायन वॉर्डातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 21 जानेवारीला मोठ्या प्रमाणात पाणीकपात होणार आहे. तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मुंबईतील भायखळा परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन आणि डॉकयार्ड रोडजवळील 1450 मिमी व्यासाची जुनी पाईपलाईन काढण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले जाणार आहे.

त्यामुळे कुलाबा, सँडहर्स्ट रोड, भायखळा, परळ आणि माटुंगा, वडाळा यासह सायन परिसरात 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, या काळात परळ आणि सायन वॉर्डातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

- Advertisement -

डॉकयार्ड रोड याठिकाणी मोठ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे 21 जानेवारीला सकाळी 10 ते 22 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांसाठी शहर भागातील कुलाबा, महमंद अली रोड, भायखळा, माझगाव, परळ, शिवडी, सायन, माटुंगा व वडाळा आदी भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत आवश्यक पाण्याचा वापर जपून करावा आणि त्यासाठी अगोदरच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिका जल अभियंता खात्यामार्फत करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेतर्फे भायखळा विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन म्हातारपाखाडी तसेच डॉकयार्ड मार्गालगत असलेली 1450 मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी काढण्याचे काम 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत कुलाबा, नेव्हल डॉकयार्ड, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, आर. बी. आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शन पासून रिगल सिनेमापर्यंत, तसेच बाबुला टँक झोन, मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग येथे 22 जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

- Advertisement -

तसेच डोंगरी, नूरबाग, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल स्ट्रिट, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रोड, डोंगरी, उमरखाडी, शायदा मार्ग आणि नूरबाग, डॉ. महेश्वरी मार्ग, बीपीटी, वाडी बंदर, डॉकयार्ड रोड, मध्य रेल्वे यार्ड, हिंदमाता येथेही पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे.


हेही वाचाः Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -