घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरपाणी, आरक्षण, रुग्णालयातील मृत्यू अन् बरच काही...; मराठवाडाच का धुमसतोय?

पाणी, आरक्षण, रुग्णालयातील मृत्यू अन् बरच काही…; मराठवाडाच का धुमसतोय?

Subscribe

स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला होता.

मुंबई : सुसंस्कृत आणि तेवढेच बलशाली राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सहा विभागापैकी चर्चेत आहे तो फक्त मराठवाडा विभाग. याच विभागात कधी सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो तर कधी तर आरक्षणाचा मुद्दा. आता याच मराठवाड्यात जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटलेला असताना न्यायालयाने त्यावर तोडगा काढला. तोडग्याचा निर्णय सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहचत नाही तोच यात मराठवाड्यातील जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाने हल्ला करत तोडफोड केली. तेव्हा प्रश्न उपस्थित होतोय तो मराठवाडाच का धुसमसतोय? (Water reservation hospital deaths and many more… Why is Marathwada smoking)

स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला होता. या मराठवाड्यात ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. मराठ्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या औरंगजबाची कबरही याच मराठवाड्यात आहे. त्या इतिहासात जाण्याची सध्या गरज नाहीच. मात्र, या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहर आशिया खंडात सर्वाधिक झपाट्याने विकसीत होणारे शहर म्हणूनही नावलौलिकात आहे. असे असताना ऑगस्ट 2023 पासून हाच मराठवाडा या ना त्या कारणानाने का जळतोय, सर्वसामान्यांचे प्रश्न, आरक्षणाचा मुद्दा, मराठा आंदोलक, उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला, आता जायकवाडीचा प्रश्न आणि मध्येच नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे नेमकं मराठवाड्यात चाललय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना न पडेल तरच नवल. तेव्हा ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजकारण्यांची भूमिका काय आहे की यामागेही कुठे राजकारण शिजतेय हेही पाहणे गरजेचे झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्याचे गृहमंत्री फडणवीसांसह आणखी एका मंत्र्याला दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रुग्णालयातील मृत्यू विसरलेच कसे?

ठाण्यातील महापालिकेच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र पुन्हा हादरला होता तो नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यू सत्राने. या मृत्यू सत्राचे लोण छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयापर्यंत जाऊन पोहचले होते. या घटनेवरसुद्धा सत्ताधारी विरोधक आमने सामने आले होते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या पण नंतर हे सगळं शांत झालं. आता त्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अहवालावर सत्ताधारी सोडा विरोधकही त्यावर काही बोलताना दिसत नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा : मराठवाड्याला जायकवाडी धरणातून ‘एवढे’ पाणी सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जाळपोळीनंतर आता सभांचे सत्र

मराठवाड्यातील बीडमध्ये काही दिवसांपूर्वीच आमदारांच्या घरे, वाहने जाळल्याची घटना घडली होती. याचा पोलिसांनी तपास करून जाळपोळ करणाऱ्या त्या कथित आरोपींना अटकसुद्धा केली आहे. परंतू हे सगळं शांत होत नाही तोच आता मराठा सोबतच ओबीसी नेत्यांकडून सभा घेऊन एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिले जात आहे. तेव्हा ही आगामी निवडणुकांमध्ये आपली अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी तर हे प्रयत्न केले जात नाहीत ना अशी शंका सर्वसामान्यांकडून उपस्थित केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -