जलयुक्त शिवार, मेट्रो मार्गी लावणार, शेतकरी आत्महत्या रोखणार; शिंदे सरकारकडून आश्वासनांची बरसात

maharashtra Chief Minister Eknath shinde today Delhi visit meet pm modi and amit shah

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अखेर संपला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने त्यांनी पाठिंबा देत मंत्रिमंडळ देखील स्थापन झाले. दरम्यान काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक बैठक देखील पार पडली. यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासह शेतकरी आत्महत्या रोखणारपर्यंत असे अनेक आश्वासने दिली आहे. याशिवाय मुंबईला तुंबई होण्यापासून रोखण्यासाठी देखील महत्त्वाची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत मोठ्याप्रमाणात पाऊस सुरु आहे, डिजास्टर मॅनेजमेंटची बैठक होत आहे तिथे मी जातोय. कारण शेवटी मुंबईत कुठल्याही परिस्थितीत अतिवृष्टीमुळे लोकांचे नागरिकांच नुकसान होऊ नये यासाठी मी स्वत: बैठक घेत आहे, त्याचबरोबर ३ आणि ४ जुलैला राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले आहे, त्यामध्ये पुढील कारवाई दोन्ही दिवसात होणार आहे, त्याचबरोबर आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरा केली जाते, या दिवशी राज्यातील बळीराजा शेतकऱ्यावर कोणत्याही परिस्थिती संकट येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी मोठ्याप्रमाणात निर्णय घेत आहोत.

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हा राज्य सरकारचा संकल्प 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी देखील मार्ग काढत आहोत. शेतीला हमी भाव, चांगला भाव मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमुलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांच जीवन सुखी समृद्ध झालं पाहिजे, यासाठी राज्य सरकार आजच्या दिवशी संकल्प करत आहे की, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. असही मुख्यमंत्री म्हणाले.

रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारचे प्रयत्न 

त्याबरोबर राज्यात सुरुवातीपासून भूमिका घेतली आहे, बाळासाहेबांची शिकवण आणि दिघे साहेब हिंदुत्व पुढे नेणार आहे, त्याचबरोबर राज्यातील विकास प्रकल्पांना मार्गी लावणं चालना देणं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प, जलयुक्त शिवार, मेट्रोचे रखडलेले प्रकल्प यासाठी मोठ्याप्रमाणात जमिनी हस्तांतरित केल्या जातील यामुळे जमीन सिंचनाखाली येईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल, जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि सहकार्य प्रयत्न करणार आहोत गती देणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.


माझा राग मुंबईवर काढू नका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, उद्धव ठाकरेंची विनंती