Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Water shortage : राज्यात पावसाने मारली दडी, 'या' जिल्ह्यांत पाणीटंचाईचे संकट

Water shortage : राज्यात पावसाने मारली दडी, ‘या’ जिल्ह्यांत पाणीटंचाईचे संकट

Subscribe

जुलै महिन्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारलेली आहे. त्यामुळे आता शेतीसोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यावर पाणी टंचाईचे देखील संकट ओढावलेले आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिक हे पाणी टंचाईपासून बचाव करण्यासाठी आता पाण्याचे टँकर मागवू लागले आहेत.

मुंबई : जुलै महिन्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे. खरीपाची पिके आता जळू लागल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. परंतु आता शेतीसोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पाणी टंचाईचे देखील संकट ओढावलेले आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिक हे पाणी टंचाईपासून बचाव करण्यासाठी आता पाण्याचे टँकर मागवू लागले आहेत. एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकून 1 हजार 403 वाड्यांना आणि 363 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु मागील वर्षी हेच प्रमाण हे केवळ 19 वाड्या आणि 10 गावे इतकेच होते. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाणीटंचाईची समस्या ही भीषण आहे. (Water shortage : crisis of water shortage in these districts of the state)

हेही वाचा – बहिणभावाचा सणाला मिळणार लालपरी जोड, नियमित गाड्यांसह जादा ९० गाड्यांची फौज

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पीकपेरणी अहवालाच्या माध्यमातून राज्यातील पावसाचे आणि पेरणीबाबतची भीषण अवस्था समोर आली आहे. त्यामुळे आता सद्यपरिस्थितीमध्ये राज्यात 386 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये 338 खासगी आणि 48 सरकारी टँकरचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत असतानाच आता नागरिकांवर पाणी टंचाईचे देखील संकट ओढावलेले आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर हे नवे आव्हान उभे राहिले आहे. पीकपेरणी अहवालाच्या माध्यमातून समोर आलेली माहिती ही मुख्यमंत्री कार्यालय आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या कार्यालयात पाठविण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट

राज्यात यंदाच्या वर्षी काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. चंद्रपूर जिल्ह्यात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता काही जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढावल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. मागील दोन वर्ष कोल्हापूर आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुर आला होता. परंतु या वर्षी पावसाने दडी मारल्याने या जिल्ह्यांवर पाणीटंचाई संकट आलेले आहे. पाणीटंचाईमुळे सातारा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे, कारण या जिल्ह्यातील 400 वाड्यांना आणि 78 गावांना पाण्याचे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

- Advertisement -

याशिवाय, अहमदनगरमधील 379 वाड्यांना आणि 66 गावांना पाण्याचे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, पुण्यातील 274 वाड्यांना आणि 34 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याशिवाय सांगलीतील 176 वाड्या आणि 29 गावांना टँकरने पाणी पुरवले जात असल्याची माहिती पीकपेरणी अहवालाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. तसेच, मागील आठवड्यामध्ये राज्यातील एकूण 1 हजार 319 वाड्यांना, तर 350 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यात 49 शासकीय आणि 320 खासगी अशा एकूण 369 टँकरचा समावेश होता.

- Advertisment -