घरठाणेठाण्यात मुसळधार पावसानंतरही पुढील तीन ते चार दिवस पाणी कपात

ठाण्यात मुसळधार पावसानंतरही पुढील तीन ते चार दिवस पाणी कपात

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि राज्यातील काही भागांत अतिवृष्टी होत आहे. ठाण्यात सुद्दा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एकीकडे ठाण्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी दुसरीकडे पुढील तीन ते चार दिवस ठाण्यात पाणी कपात करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे.

या पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे. परिणामी ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील तीन ते चार दिवसांपासून कमी प्रमाणात होत असून पाऊस व पुराचे पाणी कमी होईपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ठाण्यात पावसाची जोरदार बॅटींग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण बचावले आहेत. तसेच एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर्णा आणि लेंडी नदीला पूर आला असून १८ गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा : वसईत दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, एनडीआरएफ दाखल, चार जण बचावले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -