मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा ५० टक्क्यांवर

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या तलावातील पाणीसाठ ५० टक्क्यांलक पोहोचला आहे. मुंबईला ७ तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.

Water Resources That Supply Water To Mumbai

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या तलावातील पाणीसाठ ५० टक्क्यांलक पोहोचला आहे. मुंबईला ७ तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार, उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांमधील पाण्याचा साठा सध्या ५०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. (water storage in dams increased due to heavy rain Mumbai)

पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणी तुटवड्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. तलावांतील जलसाठा खालावल्यामुळे प्रशासनाने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, ७ जुलै रोजी जलसाठा २५ टक्क्यांवर पोहोचताच प्रशासनाने १० टक्के पाणी कपात रद्द केली.

दरम्यान, अवघ्या पाच दिवसांत तलावांतील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल दुप्पट झाला आहे. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

सध्या सातही तलावांमध्ये ७ लाख २८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. येत्या काळात तलाव काठोकाठ भरतील अशी अपेक्षा जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने (Rainfall) जोरदार बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाकडून मुंबईसाठी (Mumbai) पुढील २ दिवस सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. शिवाय, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – …मग काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा का? निलेश राणे यांचा शिवसेनेला सवाल