मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १४.८० टक्के पाणीसाठा

मुंबईत मागील दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे (Heavy Rainfall) मुंबईकरांना पाणी पुरवठा (Water Storage) करणाऱ्या तलावांमधील पाणीपातळी वाढली आहे. या तलावांमध्ये पाऊस सतत पडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Good news for Mumbaikars Increased water storage due light rain falling in lake area

मुंबईत मागील दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे (Heavy Rainfall) मुंबईकरांना पाणी पुरवठा (Water Storage) करणाऱ्या तलावांमधील पाणीपातळी वाढली आहे. या तलावांमध्ये पाऊस सतत पडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईकरांना (Mumbai) अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. (water storage increased in lakes supplying water to mumbai)

जूनमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे सातही तलावांमधील जलसाठा खालावला होता. जलसाठा खालावल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र, सध्यस्थितीत तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे तलावांमधील पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी ६ वाजता तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, तलावात २ लाख १४ हजार १६९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता.

गेल्या १४ तासांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलाव परिसरात अनुक्रमे १४ मि.मी., ५६ मि.मी., ७८ मि.मी., ३१ मि.मी., ६१ मि.मी., ११९ मि.मी. व २२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

राज्याच्या अनेक भागांत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मंगळवारीही पावसाचा जोर कायम असल्याने राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून रेड अलर्ट (IMD red alert) जारी करण्यात आला आहे. तसेच, मुंबईसह कोकणातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु असून पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.


हेही वाचा – राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा