ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद

ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बुधवारी ठाण्याच्या (Thane) काही भागात पाणी पुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून पावसाळ्यापुर्वीच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत.

ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बुधवारी ठाण्याच्या (Thane) काही भागात पाणी पुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून पावसाळ्यापुर्वीच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. (Water Supply Cut in some area of thane on Wednesday)

या कामांसाठी बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बुधवार १५ जून रोजी सकाळी ९ ते गुरुवार १६ जून रोजी सकाळी ९ यावेळेत शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या दुरूस्तीच्या कामामुळे ठाणे महापालिकेच्या (TMC) स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्या टप्प्याने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

हेही वाचा – थंड पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ आजार

त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागांचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद राहील.

हेही वाचा – मुंबईकरांना खुशखबर; तलाव क्षेत्रातील रिमझिम पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ

समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा व मुंब्राचा काही भाग या भागांचा बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहील. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे पुण्यातील रुग्णालयात दाखल