घरताज्या घडामोडीमुंबईनंतर पुण्यातही पाणीटंचाई, 'या' भागांतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद

मुंबईनंतर पुण्यातही पाणीटंचाई, ‘या’ भागांतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद

Subscribe

मुंबईनंतर आता पुण्यातही दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मुंबईनंतर आता पुण्यातही दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. (water supply has been stopped in baner pashan balewadi kothrud and shivajinagar areas of pune city)

पुणे शहरातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड आणि शिवाजीनगर या भागांमध्ये पुढील दोन दिवस राहणार आहे. त्यानुसार, मंगळवारपासून गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. शहरातील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

पुण्यात महापालिकेनं शहरातील बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा बंद केल्याने लोकांना कमीत कमी पाण्यात दैनंदिन गरजा भागवाव्या लागणार आहेत. याशिवाय उपलब्ध असलेलं पाणी जपून वापरण्याचं आवाहन शहरवासियांना केले जात आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये एकाचवेळी दोन दिवसांची पाणीबाणी जारी करण्यात आल्याने लोकांना पुढील ४८ तास पाणी जपून वापरावे लागणार आहे.

मुंबईत पाणीपुरवठा बंद

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्यामार्फत पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागातील गोरेगाव, विलेपार्ले,घाटकोपर, कुर्ला, भांडुप, मरोळ- मरोशी, असल्फा, सांताक्रूझ, खार या भागात काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, गोरेगाव, बिंबीसार नगर, धारावी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


हेही वाचा – एका चहावालीवर 4 वयस्करांचं जडलं प्रेम, पाचव्याने केलं प्रपोज आणि…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -