कुर्ला, वडाळा, घाटकोपरमध्ये २४ तास पाणी बंद, दादरलगत शहरांत कमी दाबाने पाणी

Water supply stop for 24 hours in Kurla Wadala Ghatkopar and low pressure water supply in dadar
कुर्ला, वडाळा, घाटकोपरमध्ये २४ तास पाणी बंद, दादरलगत शहरांत कमी दाबाने पाणी

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत पूर्व उपनगरातील ‘एन’ विभागातील सोमैया नाल्याखालून महापालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे टप्पा – १ चे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपासून १९ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत म्हणजे २४ तास कुर्ला, वडाळा, टिळकनगर व घाटकोपर येथे काही विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, दादर, परळ, लालबाग परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

सदर विभागातील नागरिकांनी पालिकेचे काम सुरू होण्यापूर्वीच आवश्यक पाणीसाठा करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

२४ तास पाणी पुरवठा बंद राहणार 

१) ‘एल/पूर्व’ विभाग -:

राहूल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

२) ‘एन’ विभाग -:

राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

३) ‘एम पश्चिम’ विभाग -:

टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर १४९ व १५१ या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

४) ‘एफ/उत्तर’ विभाग -:

वडाला ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील..

कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

५) ‘एफ/ दक्षिण’ विभाग -:

शहर उत्तर – दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता या विभागात कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

६) शहर दक्षिण -:

परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली या विभागात कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


हेही वाचा : मुंब्र्यातील 6 कोटींच्या घबाड प्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित