घरमहाराष्ट्रकुर्ल्याच्या खैरानी रोड येथील काही परिसरात सलग तीन शनिवारी पाणीपुरवठा बंद

कुर्ल्याच्या खैरानी रोड येथील काही परिसरात सलग तीन शनिवारी पाणीपुरवठा बंद

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे (BMC) उपजल अभियंता (परीरक्षण) खात्यातील पूर्व उपनगरातील `एल` वॉर्डमधील खैरानी रोडवरील जमिनीखालील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे (असल्फा आऊटलेट) तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर यादरम्यान पुनर्वसन व मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे कुर्ल्याच्या खैरानी रोड परिसरातील (Khairani Road Area) काही भागांत सलग तीन शनिवारी म्हणजे १३, २० आणि २७ मे या तीन दिवसांत पाणीपुरवठा (Water supply) बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या विभागांतील नागरिकांनी आदल्या दिवशीच आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून त्याचा जपून वापर करावा आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पालिका जलअभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.

पालिका जलअभियंता खात्याने पूर्व उपनगरातील `एल` वॉर्डमधील खैरानी रोडवरील जमिनीखालील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे (असल्फा आऊटलेट) तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर यादरम्यान पुनर्वसन व मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. वास्तविक या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी आवश्यक होता. त्यापैकी ७ दिवसांचे काम टप्पेनिहाय पद्धतीने पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कामासाठी सलग ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, हे काम दर शुक्रवारी दुपारी १ वाजल्यापासून रविवार पहाटे ५ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दर शनिवारी म्हणजेच १३ मे, २० मे आणि २७ मे या तीन दिवशी `एल` वॉर्डमधील खैरानी रोड परिसरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे.

- Advertisement -

खालील भागात पाणीपुरवठा राहणार बंद
‘एल पूर्व’ विभाग : संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुझा कंपाउंड, लक्ष्मी नारायण रोड, जोश नगर, आजाद मार्केट. (सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वा. ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, १३ मे, २० मे आणि २७ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.)

हेही वाचा – पक्षफुटीच्या आधीची घटना ग्राह्य धरा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -