घरठाणेठाण्यातील काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद

ठाण्यातील काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद

Subscribe

ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरण व मजबुतीकरणची कामे हाती घेतलेली आहेत. यामुळे शुक्रवार २७ जानेवारी २०२३ रोजी एम आयडीसीच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांकरिता बंद राहणार आहे.

दिवा, खर्डी,पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, डावले, भोलेनाथ – सिबलीनगर, कौसा, मुंबा कळवा, गणपतीपाडा विटावा कोलशेत, नेहरूनगर इ. ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार याची नागरीकांनी नोंद घ्यावी, तसेच पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नोंद घेवून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वाडा-गढी हलत नसली, तरी..; संभाजी पाटील-निलंगेकरांची देशमुखांवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -