Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी धबधब्याच्या ‘तो’ दगड फोडणार वाघाची डरकाळी!

धबधब्याच्या ‘तो’ दगड फोडणार वाघाची डरकाळी!

Related Story

- Advertisement -

पावसाळा सुरू झाला की रायगडातील धबधबे ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप या धबधब्यांकडे वळतात. तालुक्यातील बेलोशी सागवाडी आदिवासीवाडीवर कोंडीचा धबधबा असून, त्या ठिकाणी मोठमोठे दगड आहेत. यातील एका दगडाला खानाव येथील चित्रकार महेंद्र गावंड याने आकार देत वाघ डरकाळी फोडतानाची कलाकृती साकारली आहे. त्यामुळे दगडही आता डरकाळी फोडणार आहेत. ही कलाकृती सेल्फी पॉइंट म्हणूनही प्रसिद्ध होऊ शकते.

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात होत असते. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, तसेच देश-विदेशातील पर्यटक धबधब्यावर आनंद लुटण्यास येत असतात. नैसर्गिकरित्या कोसळणार्‍या धबधब्याच्या पाण्यात पर्यटक मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतात. कुर्डुस, कार्लेखिंड, राम धरणेश्वर, सिद्धेश्वर, कोंडीचा धबधबा, तसेच इतर अनेक छोटे-मोठे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करीत असतात. यातून स्थानिक नागरिकांना रोजगारही मिळत असतो.
बेलोशी सागवाडी आदिवासीवाडी येथून 15 मिनिटांवर कोंडीचा नैसर्गिक धबधबा आहे. हा धबधबा बारमाही वाहत असतो. या ठिकाणी अनेक मोठमोठे दगड विखुरलेले आहेत. कोंडीचा धबधबा हा तसा दुर्लक्षित असून, फार कमी जणांना याची माहिती आहे. त्यामुळे या धबधब्याची माहिती नागरिकांना व्हावी आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने स्थानिक तरुणाचे प्रयत्न सुरू आहेत. धबधब्याजवळ वाघाच्या तोंडाच्या आकाराचा दगड तयार झालेला आहे. या दगडाला आपल्या सहकार्‍याच्या साहाय्याने महेंद्र याने रंगरंगोटी करून सुंदर अशी वाघ डरकाळी फोडतानाची कलाकृती साकारली आहे.
वाघाची बनविलेली ही कलाकृती धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार असून, सेल्फी पॉईंट म्हणून ओळख ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगारही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतर काही कलाकृतीही दगडावर बनविणार असल्याचे महेंद्र याने संगितले.

- Advertisement -