सेल्फी घेणं जिवावर बेतलं; ४ तरुणींचा खड्ड्यात पडून मृत्यू

धरणाजवळ सेल्फी घेताना पाच तरुणी पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यात एका धरणाजवळील खड्ड्यात सेल्फी घेताना ही घटना घडली. या घटनेत बेळगावमधील 5 तरुणी पाण्यात पडल्या. त्यापैकी एकीला वाचवण्यात यश आले असून चौघींचा मृत्यू झाला आहे.

धरणाजवळ सेल्फी घेताना पाच तरुणी पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यात एका धरणाजवळील खड्ड्यात सेल्फी घेताना ही घटना घडली. या घटनेत बेळगावमधील 5 तरुणी पाण्यात पडल्या. त्यापैकी एकीला वाचवण्यात यश आले असून चौघींचा मृत्यू झाला आहे. बचावलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (waterfall selfie chandgad four young college girls died after drowning)

असिया मुजावर (१७), कुदासिया पटेल (२०), रुक्षार बिस्ती (२०) आणि तस्मिया (२०) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुमारे ४० महाविद्यालयीन तरुणी पर्यटनासाठी आल्यानंतर ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या किटवाड धबधब्यात बेळगावमधील ४ महाविद्यालयीन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवर किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारा धरण आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या ठिकाणी एक छोटेसे धबधब्याचे ठिकाण आहे. हा पिकनिक स्पॉट असल्याने पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. मात्र येथे असलेल्या खोल खड्ड्यात पडून बेळगावमधील चार तरुणींना जीव गमवावा लागला.

नेमके काय घडले?

किटवाड येथील धरणावर धबधब्याचे पाणी पडून तयार झालेल्या खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पाचही तरुणी पाण्यात बुडाल्या. यामधील चार जणींचा जागीच मृत्यू झाला. तर एकीला वाचवण्यात यश आले.


हेही वाचा – एक दिवस सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा… उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केसरकरांची संतप्त प्रतिक्रिया