घरमहाराष्ट्रWC Final 2023: 'मुंबईतून सगळंच खेचून न्यायचं'; राऊतांची टीका म्हणाले, भाजपचा मोठा...

WC Final 2023: ‘मुंबईतून सगळंच खेचून न्यायचं’; राऊतांची टीका म्हणाले, भाजपचा मोठा गेम प्लॅन…

Subscribe

क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी निर्माण झालेली आहे. कालचा विश्वचषक जर भारतानं जिंकला असता तर त्याचं पूर्ण श्रेय भाजपानं घेण्याचा प्रयत्न केला असता असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई: क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी निर्माण झालेली आहे. कालचा विश्वचषक जर भारतानं जिंकला असता तर त्याचं पूर्ण श्रेय भाजपानं घेण्याचा प्रयत्न केला असता असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, क्रिकेटची पंढरी मुंबई आहे, दिल्लीला क्रिकेटचा माहोल असतो. पण,  मुंबईतून सगळंच खेचून न्यायचं, या ओढाताणीमध्ये गडबड झाल्याचं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. (WC Final 2023 To pull everything from Mumbai Sanjay Raut s criticism said BJP s big game plan Kapil dev Narendra Modi)

.. तर यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं

कपिल देव यांचं मी निवेदन ऐकलं. ज्यांनी देशाला सर्वप्रथम विश्वचषक मिळवून दिला आणि भारत जगज्जेता आहे आणि होऊ शकतो ही भावना निर्माण केली. त्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला त्यांच्या 1983 च्या संपूर्ण संघाला बोलवण्यात आलं नाही. कारण, कपिल देव जर तिथे आले असते तर इतर नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, असा टोला राऊतांनी यावेळी भाजपच्या नेत्यांना लगावला.

- Advertisement -

या देशात खेळाडू वृत्ती आहे आणि खेळात हार-जीत होत असते. जो संघ सलग 10 सामने जिंकला तो संघ नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हरला. खरं तर फायनलचे सामने दिल्लीत फिरोज शहा कोटला मैदानावर किंवा मग मुंबईत वानखेडेवर खेळवले जातात. परंतु, क्रिकेटमध्ये जी एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. त्यांनी वल्लभभाई पटेल यांचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडिअम केलं आणि त्यानंतर या स्टेडिअमवर अंतिम सामना घेऊन त्याचं सगळं श्रेय भाजपला लाटायचं होतं, असा आरोप राऊतांनी केला आहे. ते म्हणाले की, हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भाजप असल्याचं जगाला दाखवण्याचा प्रयत्न झाला.

भारत जरी हरला असला तरी या संघाचं कौतुक करायला हवं. त्यांच्यात जिंकण्याची जिद्द होती आणि भाजपच्या दु:खात मी सहभागी आहे, असा खोचक टोला राऊतांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

नोटिसा येत असतात

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनच्या वेळी शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळी ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या हाणामारी संदर्भात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की एकाच बाजूच्या लोकांना नोटीसा आल्या असतील तर ते चुकीचं आहे. आम्ही सुद्धा जेलमध्ये जाऊन आलो, या नोटीसा वगैरे येत असतात.

(हेही वाचा: …तर भारताचे दोन तुकडे झाले असते; डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करताना वडेट्टीवार असं का म्हणाले? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -