घर महाराष्ट्र शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेणाऱ्यांच्या विरोधात आम्ही - शरद पवार

शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेणाऱ्यांच्या विरोधात आम्ही – शरद पवार

Subscribe

सातारा : शेतकऱ्यांच्या हिताच्या आड योणाऱ्यांना आमची साथ नाही, अश शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शरद पवार यांन कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ झाल्याच्या मुद्यांवर केंद्र सरकारला लक्ष केले. यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषी मंत्री असताना कांद्यावर कुठलेही निर्यात शुल्क लावले नाही, असे ही शरद पवारांनी साताऱ्याच्या दहिवडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आठवणीने सांगितले.

कांदा प्रश्नारवर शरद पवार म्हणाले, “आज काय स्थिती बघायला मिळते. सोने काय भाव वाढले. एकाबाजूला महागाई आहे. त्याला केंद्र सरकारकडे उत्तर नाही. दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आहे. त्यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शन नाही. जो कष्टकरी शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येतो. त्याला आमची सात नाही. त्याला आमचा पाठिंबा नाही. जर कोणी धोरणे ऐकली तर ती बदलून घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामुहीक शक्ती हवी, एकमताचे वातावरण समस्त हिंदुस्तानात तयार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्या दृष्टीकोनातून आज या प्रश्नाकडे बघतोय.”

- Advertisement -

 

हेही वाचा – Sharad Pawar : “अजित पवार आमचेच नेते…,” सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

सरकारविरोधात संघर्ष करावा लागेल

- Advertisement -

“साखर परदेशाच जाऊ लागली. साखरेवर बंधन घालावे, ऊसाचे पीक हे देशाच्या ठरावीक राज्यात घेतले जाते. यात महाराष्ट्र दोन नंबरचे राज्य आहे. ऊसापासून साखर झाली ती जागत पाठविली. आणि दोन पैसे ऊस उत्पादकाला मिळाली. केंद्र सरकारच्या पोटात का दुखते हे मला कळत नाही. कांदा, ऊस, टोमेटो असेल किंवा अन्य कोणत्याही शेती माल असेल. त्यावर बंधनने नको, त्यावर कोणत्याही उत्पादन खर्चावर शेतकऱ्याला नफा मिळेल. या पद्धतीने किंमत देईला पाहिजे. ते सरकार देत नसेल, तर त्या सरकारविरोधात संघर्ष करावा लागेल”, असे संकेतही शरद पवारांनी दिले.

- Advertisment -