घरमहाराष्ट्रयासाठी सरकारच्या विरोधात बोलतो - उद्धव ठाकरे

यासाठी सरकारच्या विरोधात बोलतो – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना सत्तेत असूनही वारंवार सरकारच्याच विरोधात टीका करते, याचे गमक काय? उद्धव ठाकरेंनी लातूरच्या सभेत सांगितले कारण...

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध ठिकाणी सभा घेऊन ते पक्षाची भूमिका मांडत आहेत. आज लातूर येथील सभेत बोलताना आपण सत्तेत सहभागी असूनही वारंवार सरकारच्या विरोधात का बोलतो? याचे खरे कारण त्यांनी दिले. “मला अनेकवेळा विचारले जाते की सत्तेत असूनही विरोधात कसे काय बोलता? हा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मी सरकारच्या विरोधात नाही तर जनतेच्या बाजूने बोलत असतो.”

लातूर जिल्ह्यात आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंचांग न बघता, थेट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच नोटबंदी करताना आणि पेट्रोल-डिझेल आणि गॅसची दरवाढ करताना पंचांग बघता का? ते थेट केले जाते, मग दुष्काळ जाहीर करण्यासाठी इतका उशीर का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

हे वाचा – उद्धव ठाकरे गोंधळलेले राजकारणी – विखे पाटील

राज्यात दुष्काळाची परिस्थिती असली तरी गाजराचे पिक जोरात येणार, असे म्हणत भाजपच्या घोषणाबाजीवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. १५ लाख बँकेत येणार या घोषणेप्रमाणे अच्छे दिनाचीही घोषणा हवेतच विरली आहे. शिवसेना मात्र खोट्या आश्वासनात भागीदार होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -

राम मंदिरासाठी अयोध्येला जाणारच

भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केंद्रात सत्ता मिळवली. पण आता पाच वर्ष होत आली तरी राम मंदिर बांधायचे नाव घेत नाही. मंदिर बांधण्याची तारिख आजवर भाजपने कधीच सांगितलेली नाही, आता मंदिर कधी बांधणार त्याची तारिख सांगाच, असे आव्हान ठाकरेंनी या सभेत दिले. तसेच राम मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्षांनी दिलेल्या आमंत्रणानुसार २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणारच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे वाचा – शिवसेना दसरा मेळावा : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -