घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'आम्ही मित्रांना दगा देणारे नाहीत'; नाना पाटोलेंचा पुन्हा नाराजीचा सुर

‘आम्ही मित्रांना दगा देणारे नाहीत’; नाना पाटोलेंचा पुन्हा नाराजीचा सुर

Subscribe

नाशिक : महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत एकत्र आलेले पक्ष आहोत. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना एकमेकांना विश्वासात घेउन ते व्हायला हवे. दोस्ती असेल तर, सगळया गोष्टी एकमेकांना विचारून केल्या पाहिजे. आपल्या मताने सगळया गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती म्हणत नाही. मला ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितले तेव्हा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगायला गेलो होतो. आम्ही मित्रांना दगा देणारे लोक नाही आहोत. पण त्यांना फॉर्मालिटी पाळायची नसेल तर ठीक आहे कोणावर जबरदस्ती नाही अशी नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्यावतीने आझादी का गौरव पदयात्रेनिमित्त पटोल यांच्या उपस्थितीत आज शहरातून गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदावरून सध्या मविआमध्ये नाराजी असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीनपक्ष नेते झाले, विधान परिषद नेतेपद आम्हाला हवे होते बसून निर्णय घेता आला असता. मात्र, आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असे म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विधानसभा सभागृहात राष्ट्रवादीचे अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. वरच्या सभागृहात नीलम गोर्‍हे उपसभापती आहे. आमच्या खूप कमी जागा आहे, असा विषय नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहे. राष्ट्रवादीच्या 10 जागा आहे, आमच्याही 10 जागा आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. नाहीतर त्यांचेही दहा होते. आम्ही मित्र घेऊन चालणारे लोक आहोत, मित्रांना दगा देत नाही. विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीनपक्ष नेते झाले, विधान परिषद नेतेपद आम्हाला हवे होते बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले पटोले

  • स्वातंत्र्याचा महोत्सव हा भाजपने इव्हेंट केला
  • काँग्रेसने रॅली काढल्यानेच भाजपकडून हे अभियान राबवलं जातंय.
  • देशाविषयी अभिमान सांगायचा अन ध्वज चीनमधून खरेदी करायचे.
  • राज्यात राजकीय व्यवस्थेत भाजपचा नंगानाच सुरू आहे
  • विरोधात बोलले की त्याच्यावर कारवाई केली जाते.
  • राज्यात सत्तेवर आलेले सरकार असंवैधानिक आहे
  • न्यायालयाकडून दिल्या जाणारी तारीख पे तारीख ही वाईट प्रक्रिया
  • भाजपला मित्र पक्ष सोडून जात आहे बिहार हे त्याचे उदाहरण
  • भाजप जवळ वॉशिंग मशिन आहे.
  • देशाची लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे.
  • मुख्यमंत्री शिंदे सभ्य पण दम द्यायची सवय दिल्लीतून
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -