घर महाराष्ट्र पुणे आम्ही कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाही; अजित पवारांचे खणखणीत उत्तर

आम्ही कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाही; अजित पवारांचे खणखणीत उत्तर

Subscribe

कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या उत्तरदायित्व सभेत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

कोल्हापूर : आज आमच्यावर आरोप केल्या जातो की, आम्ही दबावापोटी महायुतीत सहभागी झालो. हो आमच्यावर जरूर दबाव होता पण लोकांची कामे करण्याचा. लोकांची कामे करण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो. आम्ही कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाही आहोत, आम्ही पण मराठ्यांची ओलाद आहोत असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला खणखणीत उत्तर दिले.(We are not people who bow to any pressure; Ajit Pawar’s dignified answer)

कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या उत्तरदायित्व सभेत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटाने कोल्हापूरमध्ये सभा घेऊन केलेल्या आरोपाला जोरदार उत्तर दिले.

- Advertisement -

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आज ज्या भूमीत मी उभा आहे ती शाहू महाराजांची भूमी आहे. मुंबई जशी आर्थिक राजधानी तर पुणे जसे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते अगदी तसेच कोल्हापूरसुद्धा सामाजिक वैचारिक आणि पुरोगामी चळवळीचं शहर म्हणून ओळखले जाते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आई अंबाबाईच्या चरणी नथमस्तक होत बळीराजाचं संकट दूर करण्यासाठी साकडं घातलं. शाहू महाराज द्रष्टे नेते होते. आज आम्ही लोक प्रतिनिधी ज्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय ते त्यांनी शंभर वर्षापूर्वीच केले होते. त्यांनी त्यावेळी सर्वजातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधले होते.

हेही वाचा : नरेंद्र मोदींना विचारा गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणू? शरद पवारांचा थेट सवाल

कोल्हापूरकरांना पडलेल्या प्रश्नाचे दिले उत्तर

- Advertisement -

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असा निर्णय का घेतला असेल. काही जण सांगतात आमच्यावर दबाव होता. जरुर आमच्यावर दबाव होता. तो म्हणजे लोकांची कामे करण्याचा दबाव होता. मागील अडीच वर्षांत आम्ही जे कामे हातात घेतली होती ती रखडली होती, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असून, त्यामुळेच आज विकासकामे केली जाऊ शकतात असेही ते यावेळी म्हणाले. तर आम्ही कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाही, आम्ही पण मराठ्यांची औलाद आहोत, आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकारांच्या विचाराने पुढे जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत रहावी, जातीय सलोखा अबाधीत रहावे म्हणून आम्ही सत्तेत गेलो. असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा : माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच माहितीय; पंकजा मुडेंचा नाव न घेता टोला

भाषणात बोलून रोजगार उपलब्ध होत नसतो

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही सत्तेत सहभागी झालो म्हणून आमच्यावर आरोप होत आहे. पण आपण काही चूक करीत नाही, मधे सरकारमध्ये नव्हतो त्यामुळे कामे रखडली होती. त्यानंतर विरोधी पक्षात गेल्यानंतर निधी मिळत नव्हता. त्यामुळे आज आम्ही सत्तेत गेलो. तर भाषणात सांगून रोजगार उपलब्ध करून देता येत नाही, त्यासाठी आयटी क्षेत्र सुरू करण्याची गरज आहे असे अजित पवार हे हसन मुश्रीफ यांना उद्देशून म्हणाले.

…तर राजकारणातून निवृत्त होईल

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, काहीजण आमची बदनामी होईल म्हणून बातम्या देतात त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका, आम्ही कुठल्याही स्वार्थापोटी महायुतीत गेलो नाही. कामे करण्यासाठी गेलो आहोत. जे काही आमच्याबद्दल टीका करतात त्या सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत असताना एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना दिले की, महायुतीत सहभागी होऊ. दिले होते की नाही ते सांगा जर हे खोटे असेल तर राजकारणातून निवृत्त होईल असे उघड चॅलेंज अजित पवार यांनी शरद पवार गटाला दिले. तर सकारात्मक टीकेचे मी कधीही स्वागत करतो पण कुणी उठतय उचलली जीभ लावली टाळ्याला असे काहीही बोलून जातो. तर राजकारण युती आणि आघाडीच्या पलिकडचे आहे असे म्हणत त्यांनी सगळ्या राजकीय नेत्यांना सल्ला दिला.

- Advertisment -