घरमहाराष्ट्रआमच्यात आता बहीण-भावांचं नातं नाही, आम्ही राजकीय विरोधक; धनंजय मुंडेंचं वक्तव्य

आमच्यात आता बहीण-भावांचं नातं नाही, आम्ही राजकीय विरोधक; धनंजय मुंडेंचं वक्तव्य

Subscribe

राजकारणामुळे आमच्यात वैर निर्माण झाले आहे. आमच्यात आता बहीण - भावाचं नातं राहिलं नाही. त्यामुळे कुणाच्या वागण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे काय परिणाम होतात याचं ज्याने त्याने परीक्षण करावे.

राजकारणात भावंडांमध्ये असलेली भांडणं ही सर्वानाच माहित आहेत. राज्याच्या राजकारणात (maharahstra politics) अशी अनेक अनेक घराणी आहेत ज्यांच्यात भांडणं आहेत त्याचप्रमाणे मुंडे घरातील बहीण – भावंडांमध्येही भांडणं आहेत. राज्यासह देशभरातही देशभरातसुद्धा अशी अनेक उदाहरणे ज्यांची घरे राजकारणामुळे दुभंगली आहेत. पंकजा मुंडे(pankaja munde) आणि धंनजय मुंडे(dhannjay munde) या भावंडांमध्ये राजकारणामुळे भाऊ – बहिणीचं नातं राहिलेलं नाही असं स्वतः माजी मंत्री धंनजय मुंडे म्हणाले.

हे ही वाचा – असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, अजित पवारांचे अब्दुल सत्तारांच्या टीकेला उत्तर

- Advertisement -

याच संदर्भांत धनंजय मुंडे म्हणाले की, राजकारणात आम्ही दोघंही एकमेकांचे वैरी आहोत. राजकारणामुळे आमच्यात वैर निर्माण झाले आहे. आमच्यात आता बहीण – भावाचं नातं राहिलं नाही. त्यामुळे कुणाच्या वागण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे काय परिणाम होतात याचं ज्याने त्याने परीक्षण करावे. वारंवार अशा प्रकारची वक्तव्यं येत आहेत ती चुकीची आहेत की बरोबर आहेत हे ज्याने त्याने आकलन करून मांडावे. ही सर्व राजकीय विधानं आहेत असं ही धनंजय मुंडे म्हणाले.

हे ही वाचा – काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक: अशोक गहलोतांनी माघार घेतल्यानंतर ‘हा’ ज्येष्ठ नेता शर्यतीत

- Advertisement -

त्याचबरोबर धनंजय म्हणले, संतश्रेष्ठ भगवानबाबांनी भगवान गडावरच्या दसऱ्याच्या परंपरा सुरु केली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असे पर्यंत ही परंपरा सुरु होती. दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा. आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावं हे ज्याने त्याने ठरवावं. मी त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे असं स्पष्ट विधान धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हे ही वाचा – मी सध्या बेरोजगार, मोदींनी ठरवलं तरी…; पंकजा मुंडेंनी भाजप नेत्यांनाच शालजोडीत लगावल्या

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -