घरठाणेऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - एकनाथ शिंदे

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – एकनाथ शिंदे

Subscribe

गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणीही प्रचंड वाढली आहे.

रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करताना येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू आहेत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी तळोजा येथील लिंडे कंपनीला भेट देऊन या कंपनीच्या कामाचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणीही प्रचंड वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याचा आढावा एकनाथ शिंदे यांनी आज या कंपनीसोबतच्या आढावा बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त, ठाणे व रायगड जिल्हाधिकारी आणि एफडीए अधिकारी यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वय साधण्यात येणार आहे.

लिंडे कंपनीकडून सध्या मुंबई, ठाणे,रायगड, पालघर यांच्यासह पुणे, नगर, औरंगाबाद येथेही ऑक्सिजन पुरवठा होतो. ही कंपनी सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने २३० मेट्रिक टन ऑक्सिजन जनरेट होतो. त्यामुळे या कंपनीतून होणारा ऑक्सिजन पुरवठा आणि त्याच वितरण सुरळीत व्हावा, तसेच त्यांना येणाऱ्या काही अडचणी तातडीने सोडवण्यात याव्यात, असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

- Advertisement -

यात प्रामुख्याने ऑक्सिजन वितरणाचे विभागवार योग्य नियोजन करणे, मिळणाऱ्या ऑक्सिजनचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करणे, ऑक्सिजन पुरवणाऱ्या ट्रकना काही विशिष्ट भागातून जाताना सोबत पोलिस संरक्षण देणे, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या चालकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचा कोरोना योद्धे म्हणून समावेश करुन त्यातील ४५ वर्षावरील चालकांचे तत्काळ लसीकरण पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयाना ज्या छोट्या पुरवठा धारकाकडून ऑक्सिजन पुरवठा होतो, त्यांच्या स्टोरेज आणि पुरवठा क्षमतेत वाढ करण्याचा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. याशिवाय यापुढे ऑक्सिजनप्रमाणेच नायट्रोजन पुरवठा करणारे छोटे टँकरही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरण्याची मुभा शासनाने दिली असल्याने त्याद्वारे छोट्या खासगी रुग्णालयाना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

- Advertisement -

या बैठकीला कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, पनवेलचे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, एफडीएचे अधिकारी आदी उपस्थित होते.

१०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन महाराष्ट्राला 

ऑक्सिजन पुरवठयातील अडचणी दूर करतानाच सध्या असलेली वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्स कंपनीला वाढीव ऑक्सिजन देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार रिलायन्सच्या जामनगर प्लांट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -