घरठाणेकधी काय होईल सांगू शकत नाही, म्हणून आम्ही गॅसवर असतो...- मुख्यमंत्री शिंदेंची...

कधी काय होईल सांगू शकत नाही, म्हणून आम्ही गॅसवर असतो…- मुख्यमंत्री शिंदेंची ‘मन की बात’

Subscribe

मुंबई : राज्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. त्यात आमदार अपात्रता प्रकरणाची टांगती तलवार आहेच. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात ‘मन की बात’ व्यक्त केली. आम्ही कायम गॅसवर असतो, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांचा जमावाने 2 नोव्हेंबर 2023 रोजी मुंब्रा येथील शाखेत घुसून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बाहेर काढले आणि शाखेचा ताबा घेतला. त्यानंतर शाखेवर बुलडोझर चालवून ती भुईसपाट केली. तिथे शाखेची नवी वास्तू उभी करणार असल्या शिंदे गटाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यावर हा तणाव आणखी वाढला.

हेही वाचा – मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात ठाकरे, फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे पिछाडीवर

- Advertisement -

त्यातच आमदार अपात्रतेची सुनावणी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. राहुल नार्वेकर यांनी 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाला द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिवसेनेच्या या आमदारांमध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये काल, रविवारी झालेल्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या खास दिवाळी पहाट कार्यक्रमात त्यांनी ‘मन की बात’ सांगितली. कधी काय होईल, कधी कोण काय बोलेल हे सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही सगळे गॅसवर असतो. तारेवरची कसरत करावी लागते. मग ताण कमी करण्यासाठी हास्यजत्रा पाहतो, असे त्यांनी सांगितले. शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, विराट संस्था आणि रंगाई यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ‘हास्यजत्रा’फेम समीर चौघुले याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -