आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही; चंद्रकांत पाटलांचे ‘मविआ’ला प्रत्युत्तर

"आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही. आम्ही विधान परिषदेला मदत करू असं त्यांना सांगितलं. आमचं केंद्राशी बोलणं झालं आहे'', असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

chandrakant patil says bjp do not interfere in eknath shinde revolt from shivsena

“आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही. आम्ही विधान परिषदेला मदत करू असं त्यांना सांगितलं. आमचं केंद्राशी बोलणं झालं आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यसभेत (Rajya Sabha Election) आमचा उमेदवार बिनविरोध राज्यसभेत पाठवा. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत तुमचा उमेदवार बिनविरोध निवडून आणू, असा प्रस्ताव आघाडीकडून भाजपाला (BJP) देण्यात आल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिला होता. या प्रस्तावावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा, मविआचा देवेंद्र फडणवीसांना प्रस्ताव

महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर चद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. “या निवडणुकीत आम्ही राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट केलं. आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही. आम्ही विधान परिषदेला मदत करू असे त्यांना सांगितले. आमचे केंद्राशी बोलणे झाले आहे. आम्ही आमचा राज्यसभेचा उमेदवार मागे घेणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा महत्त्वाची आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“या संदर्भात आमचे केंद्राशी बोलणे झाले आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीनेही आमचीच भूमिका योग्य असल्याचं सांगितली. यू गो विथ दॅट स्टँड असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. आघाडीने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार. आम्ही विधान परिषदेला पाचवी जागा लढणार नाही. तिसरी जागा लढणे आणि तिसरी जागा जिंकण्यात आम्ही खूप कॉन्फिडन्ट आहोत. त्यांनी प्रस्ताव मान्य केला नाही आमचा तर ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणार”, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – राज्यसभा निवडणुकीसाठी ‘असे’ असेल संख्याबळ, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष

“शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, ही वस्तूस्थिती चर्चेमध्ये मांडली. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे”, असेही पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा – राज्यात जातीनिहाय जनगणना होणार? राष्ट्रवादीचे नेते लागले कामाला