Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र आमच्याकडे सर्व पुरावे, सरकारने तातडीनं अध्यादेश काढावा- मनोज जरांगे पाटील

आमच्याकडे सर्व पुरावे, सरकारने तातडीनं अध्यादेश काढावा- मनोज जरांगे पाटील

Subscribe

आंदोलक जरांगे पाटील यांनी आम्ही सर्व पुरावे देतो, सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, असं म्हटलं आहे. आज, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हा इशारा सरकारला दिला आहे.

मागच्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चावरून राज्यात तणावाचं वातावरण आहे. जालन्यात मराठा समाजावर झालेल्या लाठीमार प्रकरणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला इशारा दिला आहे. आंदोलक जरांगे पाटील यांनी आम्ही सर्व पुरावे देतो, सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, असं म्हटलं आहे. आज, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हा इशारा सरकारला दिला आहे. (We have all the evidence the government should issue an ordinance urgently Manoj Jarange Patil )

तसंच, सरकारला चार दिवसांचा वेळ दिला असून, आजचा दुसरा दिवस आहे. एका दिवसात आदेश काढता येईल एवढे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी येथे यावं आम्ही त्यांना सर्व पुरावे देतो. आता सरकारने यापुढे कारणं सांगू नयेत. सरकारने आता वेळ मागण्याची गरज नाही. एका दिवसात राज्यपाल यांची भेट घ्या आणि अध्यादेश काढा, असं म्हटलं आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ मागू नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: शरद पवारांशी गद्दारी करणार्‍यांना नक्कीच धडा शिकवेल; नाशिकमध्ये युवा नेत्याचे आव्हान )

जरांगे पाटील म्हणाले की, एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही देतो. सरकारनं यावं आणि पुरावे घेऊन जावे. हैदराबादपासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. रिक्षा, डंपर भरून पुरावे माझ्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला होता त्यात कॅबिनेट बैठकही झाली. सरकारचा वेळ वाचवण्यासाठी एका दिवसात पुरावे देऊ. राज्यपालांची परवानगी घेऊन सरकारवे अध्यादेश काढावा. आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठीही तज्ज्ञ देण्याची आमची तयारी आहे. आता फक्त सरकारने अध्यादेश काढावा.

- Advertisement -

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारचं शिष्टमंडळ आमच्या भेटीला येईल ही अपेक्षा आम्ही सोडून दिली आहे. आम्ही सरकारला नाही तर सरकारच आम्हाला वेठीस धरत आहे. ओबीसी आणि मराठ्यांनी समन्वयाने वागावं. आपण एकदिलानं राहू, एकमेकांवर चिखलफेक करायला नको, असंदेखील जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisment -