घरमहाराष्ट्र‘आमचं ठरलंय’

‘आमचं ठरलंय’

Subscribe

सध्या आपली युती झाली हे काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही बोलला तरी त्याचे उलट अर्थ काढले जातील. मुख्यमंत्री कुणाचा होणार यााबत आमचं ठरलयं, तुम्ही युतीची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे फर्मान भाजप-शिवसेनेच्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले.

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपामध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर याची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. विधान भवनात सोमवारी युतीच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. नुकतेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे.

- Advertisement -

आम्ही आता 288 जागांवर बूथ बांधणी करत आहोत, पक्ष मजबूत करतोय, असे म्हटले होते. त्यामुळे सेनेत नाराजीचा सूर उमटला होता. दरम्यान गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन दिवस युतीचे वातावरण बिघडले होते. त्यामुळे बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन यांनी शिवालय येथे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र नेमकी भेट का घेतली हे गिरीश महाजन यांना विचारले असता त्यानी अधिक बोलण्यास नकार दिला.

महायुतीबाबत जे काही बोलावयाचे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे भूमिका मांडतील. तसेच युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील. आमच्यात कोण लहान-कोण मोठा भाऊ नसून आम्ही दोघेही भाऊ भाऊ आहोत.-सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -