घरमहाराष्ट्रआम्ही खुल्या पद्धतीने मैत्री करतो; 'ड्रायव्हर'च्या टीकेवरून रोहित पवारांचे प्रत्युत्तर

आम्ही खुल्या पद्धतीने मैत्री करतो; ‘ड्रायव्हर’च्या टीकेवरून रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Subscribe

भाजपने त्यांच्यावर कडाडून टिका केली होती. मात्र, या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्योगपती गौतम अदानी (Guatam Adani) यांच्या हस्ते गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नाविन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी कार्यक्रम ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य केलं. यामुळे भाजपने त्यांच्यावर कडाडून टिका केली होती. मात्र, या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (We make friends openly; Rohit Pawar’s response to ‘Driver’s’ criticism)

स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो. लपवून छपवून बाकी करतात तसं करत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल आणि त्यांच्यासाठी आपण गाडी चालवली असेल तर त्यात गैर काय? असा सवाल रोहित पवारांनी विचारला. ते आज नवी मुंबईत स्वराज्याचे पुनरागमन या नाटकाच्या प्रयोगाला आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

हेही वाचा – गौतम अदानी बारामती दौऱ्यावर, रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य

ते पुढे म्हणाले की, या घटनेवरून भाजपचे लोक जे पतंग उडवत आहेत ते त्यांनी उडवू नये. त्यांना तेवढंच कळतं. गौतम अडाींची गाडी चालवत असेन आणि त्याची चर्चा होत असेल तर होऊद्यात.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

बारामती अॅग्रीकच्लरल डेव्हलोपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान आणि नाविन्यता केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते. यावेळी बारामती विमानतळावरून गौतम अदानी यांना रोहित पवारांनी कार्यक्रमस्थळी नेलं. यावेळी स्वतः रोहित पवारांनी गाडी चालवली होती. त्यांचे गाडी चालवतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -