घरमहाराष्ट्रसरकार चालवताना शिंदेंच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सरकार चालवताना शिंदेंच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Subscribe

कुठल्‍याही बदल्‍याच्या भावनेने आमचे सरकार काम करणार नाही. आधीच्या सरकारचे निर्णय सरसकट बदलण्याचे कामही आम्‍ही करणार नाही. जे काही करू ते गुणवत्तेवर करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले

मुंबई : एक साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास एकनाथ शिंदेंनी केला आहे.बाळासाहेबांचे ते सच्चे शिवसैनिक आहेत.आमची दोघांची आधीपासूनची मैत्री आहे.सरकार चालविताना मी त्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार आहे.यात कधीही दुरावा येऊ देणार नाही.आमच्यात कधीच सत्‍ता किंवा राजकीय संघर्ष उदभवणार नाही,अशी ग्‍वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.हे सरकार ईडीमुळेच आले,ई म्‍हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र अशी कोटीही त्‍यांनी केली.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक,विश्वासदर्शक प्रस्‍तावावेळी ज्‍या लोकांनी सरकारच्या बाहेर राहूनही मदत केली त्‍या अदृष्‍य हातांचेही मी आभार मानतो, असेही फडणवीस म्हणाले. विधानसभेत शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्‍ताव संमत झाला, त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्ग ज्‍याला नंतर बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे नाव देण्यात आले त्‍या महामार्गाची जबाबदारी त्‍यांनी लीलया पेलली.आता त्‍याच्या पहिल्‍या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे.आरोग्‍य हा त्‍यांचा आवडता विषय.आरोगयमंत्री म्‍हणूनही त्‍यांनी चांगला ठसा उमटविला.त्‍यांच्यात प्रचंड माणुसकी आहे.दिवसाचे चोवीस तास काम करणारा हा नेता आहे.प्रत्‍येकासाठी धावून जाणे ही आनंद दिघेंची शिकवण त्‍यांनी कायम जपली आहे.

- Advertisement -

टिंगलटवाळी करणा-यांचा जरूर बदला घेणार

मी पुन्हा येईन अशी कविता म्‍हणालो होतो.त्‍याची अनेकांनी टिंगलटवाळी केली.या लोकांना माफ करून मी जरूर बदला घेणार आहे. दरम्‍यानच्या काळात कोणी पोस्‍ट टाकली त्‍याला आत टाक,टिका केली आत टाक असे प्रकार घडले.एका महिला खासदाराला तर १२ दिवस जेलमध्ये टाकण्यात आले.सत्‍ता येते आणि जाते. पण सत्‍तेचा अहंकार डोक्‍यात जाऊ नये. कुठल्‍याही बदल्‍याच्या भावनेने आमचे सरकार काम करणार नाही. आधीच्या सरकारचे निर्णय सरसकट बदलण्याचे कामही आम्‍ही करणार नाही. जे काही करू ते गुणवत्तेवर करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


हे सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -