घरमहाराष्ट्रआम्हीही सत्तेत होतो पण माज नाही केला; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

आम्हीही सत्तेत होतो पण माज नाही केला; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Subscribe

आम्ही कधी सत्तेत येऊन बसू ते कळणारसुद्धा नाही, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. पण जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला तर तो मी सहन करणार नाही.

राज्याच्या राजकारणात जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागली. दरम्यान विरोधी बाकावर बसलेल्या अजित पवारांनी (ajit pawar) एक सूचक इशारा दिला आहे. दिवस बदलत असतात. आम्ही कधी सत्तेत येऊन बसू ते कळणारसुद्धा नाही, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा – टाटा मेमोरियल रुग्णालयाला सिप्झकडून 1.21 कोटी रुपयांची देणगी

- Advertisement -

राजकारणात(maharashtra politics) सूचक वक्तव्य करणं किंवा टीका करणं या गोष्टी नेमहीच होत असतात. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा असंच एक सूचक विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले, ”एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही सुद्धा अनेक वर्षे सरकारमध्ये होतो. शरद पवार(sharad pawar) जेव्हा केंद्रात कृषी मंत्री होते तेव्हा आमच्याकडे केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणची सत्ता होती. जिल्हा परिषद सुद्धा होती. जवळपास सार्वच पंचायत समिती सुद्धा राष्ट्रवादीकडेच होत्या.

सोबतच इतर सत्ताही होत्या. पण एवढं असूनही आम्ही कधीच सत्तेचा मज येऊ दिला नाही. सत्तेसाठी आम्ही आमच्या विरोधकांनाही खासी त्रास दिला नाही. मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊ नका, दाबावाला नाली पडू नका आणि कारण नसताना चुकीचं काम सुद्धा करू नका. त्याचबरोबर दिवस बदल असतात, आम्ही कधी सत्तेत येऊन बसू हे कळणार सुद्धा नाही”. असंही अजित पवार म्हणले.

- Advertisement -

हे ही वाचा –  तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा; रामदास कदमांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप

याच संदर्भांत अजित पवार (ajit pawar) म्हणाले की, ”कायदा सर्वानाच सारखा असतो आमच्या पैकी कुणाचं चुकलं किंवा माझंही चुकलं तरी कारवाई करा. पण जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला तर तो मी सहन करणार नाही. पण चुका नसताना केवळ सत्तेत असणारा माणूस सांगतो म्हणून कोणत्याही व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. तर त्यांना मला सांगायचे आहे की, ही गोष्ट शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. नियम आणि कायदे सर्वांनाच सारखे असतात आणि याची दखल सर्वांनीच घ्यावी”. असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणले.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -