घरदेश-विदेशनव्या संसद भवनाची इमारत बांधताना आम्हाला विचारात घेतलं नाही- शरद पवार

नव्या संसद भवनाची इमारत बांधताना आम्हाला विचारात घेतलं नाही- शरद पवार

Subscribe

देशात नवं संसद भवन उभारण्याचा निर्णय घेत असताना, विरोधकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. परंतु विरोधकांना यावेळी विश्वासात घेण्यात आलं नाही. शरद पवार

देशाच्या संसदेच्या नव्या वास्तूचं उद्या, 28 मे, रविवारी उद्घाटन आहे. या उद्घाटनावर 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. राष्ट्रपतींना या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही तसचं, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन केले जात नसल्याचं कारणं देत विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यामागचं कारण त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. ( We were not considered while building the new Parliament building NCP President Sharad Pawar )

काय म्हणाले शरद पवार?

देशात नवं संसद भवन उभारण्याचा निर्णय घेत असताना, विरोधकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. परंतु विरोधकांना यावेळी विश्वासात घेण्यात आलं नाही. तसंच, भूमिपूजन करताना विरोधकांना विश्वासात घेतलं गेलं नाही. आता ही वास्तू तयार आहे. या वास्तूचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, अशी आम्ही सर्व विरोधकांची मागणी आहे. ती मागणी देखील सत्ताधाऱ्यांनी मान्य केलेली नाही. तसचं, उद्घाटनाचा जो कार्यक्रम ठरला त्याची चर्चाही कधी केलेली नाही त्यामुळे जर विरोधकांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी अशी भूमिका घेतली की आपण संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला  जाऊ नये, त्यामुळे माझाही त्या पाठिंबा आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांचा देशातील 270 नागरिकांकडून निषेध

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांचा देशातील 270 नागरिकांनी निषेध केला आहे. यामध्ये 88 निवृत्त नोकरशहा, 100 प्रतिष्ठित नागरिक आणि 82 शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. या लोकांनी संयुक्त निवेदन जारी करून विरोधकांवर टीका केली आहे. यामध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) माजी संचालक वाय. सी. मोदी, माजी आयएएस अधिकारी आर. डी. कपूर, गोपाल कृष्ण आणि समीरेंद्र चॅटर्जी यांच्याशिवाय लिंगया विद्यापीठाचे कुलगुरू अनिल रॉय दुबे यांचा समावेश आहे.

( हेही वाचा :New Parliament building inauguration : 250हून अधिक मान्यवरांची विरोधकांवर टीका )

- Advertisement -

नवीन संसद भवन भारतीयांसाठी अभिमानास्पद

नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. मात्र विरोधी पक्ष या निमित्ताने राजकारण करत आहे. त्यांचे पोकळ दावे आणि निराधार युक्तिवाद समजण्याच्या पलीकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या संसंद भवनाचे उद्घाटन करणार आहेत आणि तेच कारण पुढे करत सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे हे विरोधक उघडपणे लोकशाहीच्या भावनांना धक्का लावत आहेत, असे या मान्यवरांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -