घरताज्या घडामोडीपक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी; बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर संजय गायकवाडांचा संताप

पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाडांचा संताप

Subscribe

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे, त्यामुळे तयारीला लागा असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी टोला लगावला.

‘अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी’, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षांकडून आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. (We Will Contest 130 To 140 Seats Says Sanjay Gaikwad Shiv Sena Eknath Shinde Chandrashekhar Bawankule)

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे, त्यामुळे तयारीला लागा असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी टोला लगावला.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले संजय गायकवाड?

“सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजपा-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे. शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार आहोत. आमच्यापेक्षा तो पक्ष (भाजपा) मोठा असल्याने निश्चितपणे भाजपा जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही”, असे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.

- Advertisement -

त्याशिवाय, ‘अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी त्यांना (चंद्रशेखर बावनकुळे) समज द्यावी’, असेही संजय गायकवाड म्हणाले.


हेही वाचा – आता व्हाया नाशिक करा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास, गडकरींची मोठी घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -