घरमहाराष्ट्रपुण्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न - चंद्रकांत पाटील

पुण्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न – चंद्रकांत पाटील

Subscribe

निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असून लवकरच त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुण्यातील विविध भागांना चंद्रकांत पाटील यांनी आज भेट दिली.

बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहर आणि आसपासच्या परिसराचे खूप नुकसान झाले. पुण्यातील पुराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर पुण्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याबाबत निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असून लवकरच त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुण्यातील विविध भागांना चंद्रकांत पाटील यांनी आज भेट दिली.

काय म्हणाले पालकमंत्री?

“पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सांगली कोल्हापूरमधील नुकसानीच्या धर्तीवर पुण्यातील अतिवृष्टी बाधितांना मदत दिली जाईल. राज्यात आचारसंहिता सुरु आहे त्यामुळे पुण्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असून आयोगाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल,” असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुण्यातील विविध भागांना भेट देऊन आढावा घेतला. तसेच या घटनेत जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पीडितांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सांगली कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना दिलेल्या धर्तीवर पुण्यातील पुरग्रस्तांना मदत दिली जाईल. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. त्याला आयोगाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यानंतर बाधितांना शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल.”

हेही वाचा – पुणे शहराचा आज पाणी पुरवठा बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -