Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रBacchu Kadu : "आम्ही सरकार स्थापन करू"; बच्चू कडूंनी सांगितलं सत्तेत येण्याचं...

Bacchu Kadu : “आम्ही सरकार स्थापन करू”; बच्चू कडूंनी सांगितलं सत्तेत येण्याचं ‘गणित’

Subscribe

Bacchu Kadu On Bjp : माझ्या अचलपूर मतदारसंघात भाजपनं खालच्या पातळीवर प्रचार केला, असा आरोपही बच्चू कडूंनी केला आहे.

विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोलमध्ये महायुती वरचढ दिसत आहे. तर, काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. आमचं सरकार बनणार, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

लहान पक्ष आणि अपक्षांचं सरकार बनेल. आम्ही दुसऱ्यांचा पाठिंबा घेऊ. आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, असं म्हणत सत्तेत येण्याचं गणित बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

- Advertisement -

हेही वाचा : “प्रणिती शिंदे गद्दार, तिला लाज, लज्जा नाही, तुझ्या बापालाही…”, उद्धव ठाकरेंचा नेता भडकला

बच्चू कडू म्हणाले, “माझ्या अचलपूर मतदारसंघात भाजपनं खालच्या पातळीवर प्रचार केला. काँग्रेस आणि भाजप दोघेही अचलपूर मतदारसंघात संभ्रमात होते. काँग्रेसवाल्यांनी काही ठिकाणी भाजपला आणि भाजपनं काही ठिकाणी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितलं. दोघेही एकमेकांशी लढत राहिले. दोघांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पाडणं होते. निवडून येणे हा त्यांचा विषयच नव्हता. मात्र, आमचा विजय निश्चित आहे.”

- Advertisement -

“आमच्या प्रहारचे किमान 10 आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून 15 आमदार होतील. कुणाचीही सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

“लहान पक्ष आणि अपक्ष, असं गठबंधन झाल्यानंतर मग सत्तेचं स्वरूप आणि दिशा बदलेल. संपूर्ण सत्ता अपक्ष आणि लहान पक्षाकडे राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हे मोठे पक्ष ठरविणार नाही. अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार असेल. त्यासाठी आम्ही मोठ्या पक्षांचा पाठिंबा घेऊ,” असं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

हेही वाचा : विधानसभेला शिंदे की ठाकरे, कोण ठरतंय वरचढ? एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -