Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार : छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी स्मृतिस्थळावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन

NCP MLA Chhagan Bhujbal

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज(बुधवार) नववा स्मृतीदिन आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्मृतिस्थळावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे.

बाळासाहेबांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. त्यांच्या समाधीपुढे झुकण्यासाठी आम्ही आलो आहोत. साहेब गेले साहेबांचे उजवे डावे हात आपण आहोत. आपण जोपर्यंत आहोत. तोपर्यंत महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सरकार पुढे चाललं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाच्या दृष्टीने आपण सगळे कटीबद्ध आहोत. असेच पुढे देखील सुरू राहील. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

विक्रम गोखले आणि कंगना रणौत वाद

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्याला पाठींबा दिला आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं की या लोकांची जास्त नोंद घेण्याची गरज नाही. कारण लोकं सुद्धा त्यांच्यावर टीका करत आहेत. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू आणि भगतसिंह, राजगुरू अशा कित्येक लोकांच्या बलिदानामुळे हे सर्व मिळालेलं आहे.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा करोडो रूपयांची श्रीमंती बाजूला सारून त्यांनी अकरा ते साडेअकरा वर्ष तुरूंगात काढली. त्यामुळे समाज माध्यमांमधून ज्याप्रमाणे आता त्यांनी प्रतिक्रिया मिळत आहे. त्याला आपण दुर्लक्ष केलं पाहीजे. तसेच अशा लोकांना वाव देखील देता कामा नये. तिच्याबाजूने जर कुणी बोलत असेल. तर त्याच्या बाजूने उभे रहायला पाहीजे. असे छगन भुजबळ म्हणाले.

हिंदु-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या निवडणुका आल्या की हिंदु-मुस्लिम वाद निर्माण करायचा. तसेच त्यामधून आपली पोळी भाजायची. महागाई आणि बेरोजगारी, सुधारणा यांसारखे प्रश्न बाजूला पडतात आणि हिंदु-मुस्लिम यांसारख्या विषयावरती लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे सर्व काही केलं जातं. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.


हेही वाचा: सोमय्या, थोडं भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांबाबतही बोला – आमदार नाईक