Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कर्नाटकात भाजप सरकार पण महाराष्ट्राचा भाग मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही - फडणवीस

कर्नाटकात भाजप सरकार पण महाराष्ट्राचा भाग मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही – फडणवीस

संघर्षाची वेळ आली तर आम्हाला घेऊन चला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरुन गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्राचा सीमाभागी असलेल्या बेळगावसह अन्य मराठी बांधवांची गावे कर्नाटक सरकारने अनधिकृतपणे कर्नाटकात सामील केले आहेत. याविरोधात गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र सरकार आणि बेळगाव सीमाभागातील मराठा बांधव संघर्ष करत आहेत. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही देखील बेळगाव महाराष्ट्रात सामील केल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे. राज्य सरकारने आम्हाला संघर्षाच्या वेळी घेऊन चलावं आम्ही सरकारच्या पाठीशी उभे आहोत असे पक्षीय भावना सोडून अस्मितेसाठी संघर्ष करु असे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. यावर त्यांनी काही ठीकाण पक्षीय भावना सोडायची असते. ती संकुचित भावना ठेवायची नसते. तुम्ही कर्नाटकबाबत बोलता. कर्नाटकात भाजप सरकार आहे मान्य आहे. परंतु कर्नाटकटने महाराष्ट्राच्या भागावर कब्जा केला आहे. तो भाग मिळवल्याशिवाय आम्ही देखील शांत बसणार नाही. आम्ही सरकारच्या पाठीशी उभे आहोत. संघर्षाची वेळ आली तर आम्हाला घेऊन चला. तिथल्या सरकारशीपण आम्ही संघर्ष करायाला तयार आहोत. काही विषय अस्मितेचे असतात त्यात सरकार नसते. त्यात पक्ष नसतो ते अस्मितेचे विषय असतात. असे विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक समाज आहे. या मराठी समाजाला महाराष्ट्रापासून तोडण्यात आल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मागील अनेक दशकांपासून बेळगावांची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहेत. कर्नाटक सरकारकडून या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -