औरंगाबाद : घोषणा कागदावर उतरवून काम करतो, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. राज्य सरकारने आज मरावाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासाठी काही राज्य सरकारने निर्णय घेतले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यासाठी 45 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिलेले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “मराठावाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. पण खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्ती अमृतवर्ष. मराठवाड्यातील लोकांसाठी दिलासा आणि धारा देण्यासाठी ही बैठक झाली आहे. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बैठक झाली होती. काही लोक म्हणतात की, घोषणा करतात आणि त्याचा निर्णय होत नाही. मी तुम्हा सांगतो की, वर्षभरात महायुती सरकारने जे निर्णय घेतले. मग ते पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत आम्ही सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी देण्यासाठी 35 सुधारीत सिंचन प्रकल्पना मान्यता दिली. 8 लाख लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यामुळे आम्ही फक्त घोषणा करून कागदावर ठेवत नाहीत. त्यांची अंबलबजावणी करतो.”
हेही वाचा – ‘राऊत’ आले नाहीत का? मुख्यमंत्र्यांचा खोचक प्रश्न
मराठवाड्यात सुरू असलेल्या कामांची विभागनिहाय माहिती पुढीलप्रमाणे
जलसंपदा – २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम-१२ हजार ९३८ कोटी ८५ लाख
पशुसंवर्धन, दुग्धविकास,मस्त्यव्यवसाय- ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख, नियोजन – १ हजार ६०८ कोटी २८ लाख, परिवहन – १ हजार १२८ कोटी ६९ लाख, ग्रामविकास – १ हजार २९१ कोटी ४४ लाख, कृषी विभाग – ७०९ कोटी ४९ लाख, क्रीडा विभाग – ६९६ कोटी ३८ लाख, गृह – ६८४ कोटी ४५ लाख, वैद्यकीय शिक्षण – ४९८ कोटी ६ लाख, महिला व बाल विकास – ३८६ कोटी ८८ लाख, शालेय शिक्षण – 490 कोटी ७८ लाख
सार्वजनिक आरोग्य -35.37 कोटी, सामान्य प्रशासन- 287 कोटी, नगरविकास – २८१ कोटी ७१ लाख, सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख, पर्यटन – ९५ कोटी २५ लाख, मदत पुनर्वसन – ८८ कोटी ७२ लाख, वन विभाग – ६५ कोटी ४२ लाख, महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी, वस्त्रोद्योग -२५ कोटी, कौशल्य विकास-१० कोटी, विधी व न्याय- ३ कोटी ८५ लाख
जलसंपदा विभाग – मराठवाड्यातला दुष्काळ हटविणार. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणार. २२.९अ.घ.फुट पाणी वळविण्याची १४ हजार ४०कोटींची योजना राबविणार.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार. १५०कोटी
वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा. १७९३हे क्षेत्र सिंचित होणार. २८५ कोटी ६४ लाख