घरदेश-विदेशWeather alert : सावधान! उष्णतेचा कहर वाढणार, महाराष्ट्रात स्थिती काय?

Weather alert : सावधान! उष्णतेचा कहर वाढणार, महाराष्ट्रात स्थिती काय?

Subscribe

मार्च महिन्यातच उष्णतेने कहर सुरु केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे लोकंही हैराण झाली आहेत. अनेक भागातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअच्या पुढे जात आहे. मात्र अँटी- सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे 19 ते 25 मार्च दरम्यान तापमानात किंचित घट झाल्याने उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळत आहे. उत्तर आणि मध्य भारतात किमान आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रातही अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कोकण, विदर्भात 31 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शहरांचा पारा 43 अंशावर पोहचला आहे. दुपारच्या वेळेस तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी किमान चार दिवस दुपारी उन्हात जाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तरी किमान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरी 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात29 मार्च रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर खान्देशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत 30 मार्च रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे वरील सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

देशातील इतर राज्यांतील स्थिती

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3 ते 8 अंश सेल्सिअस जास्त नोंदवले जात आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा येथे तापमान सामान्यपेक्षा 2 ते 6 अंश सेल्सिअस जास्त होते.

हलक्या पावसामुळे काहीसा दिलासा

19 ते 26 मार्च दरम्यान गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ येथे तापमान सामान्यपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले. केरळ, कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाने लोकांना दिलासा मिळाला आहे.

मार्चच्या मध्यात विक्रमी उष्णता

मार्चच्या मध्यात देशात विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मार्चअखेरीस उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागात तीव्र उष्मा असेल आणि उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागणार आहे. 28 ते 31 मार्च दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये कमाल तापमान 42-44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि दुपारी ‘उष्णतेची लाट’ येण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात कमाल तापमानाने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता आहे. 29 ते 31 मार्च दरम्यान जम्मू, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या खालच्या टेकड्यांमधील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. उंचावरील काही भागात तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकते. बहुतेक क्षेत्र ‘उष्णतेची लाटेचा फटका सहन करावा लागू शकतो. पश्चिम राजस्थान, नैऋत्य हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशातील काही स्थानकांवर कमाल तापमान 43- 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.


IAS Tina Dabi Marriage : IAS ऑफिसर टीना दाबी पुन्हा होणार विवाहबद्ध, कोण आहे तिचा दुसरा पती?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -