घरमहाराष्ट्रWeather Alert: रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी; पुणे, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा

Weather Alert: रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी; पुणे, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून पुढील तीन ते चार दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे.

गेले तीन दिवस मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, आजपासून पुढील तीन ते चार दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्याने शनिवारी सांगितलं. बंगालच्या उपसागरात विकसित होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत उत्तर-उत्तर-पश्चिम भागात सरकण्याची शक्यता आहे. रविवारपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अधिक सरी बरसण्याची शक्यता आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

- Advertisement -

आयएमडीने रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे पावसाची तीव्रता वाढल्यास स्थानिक अधिकाऱ्यांनी तयार रहायचं आहे. येलो अलर्ट हा मुसळधार पावसाची शक्यता कमी दर्शवतो. उर्वरित महाराष्ट्रात येत्या ३-४ दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, सोमवारी उत्तर महाराष्ट्रात तसंच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडू शकतो, असं आयएमडीने सांगितलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -