घरताज्या घडामोडीWeather Alert: चक्रीवादळामुळे मान्सून २-३ दिवस आधी दाखल होण्याची शक्यता

Weather Alert: चक्रीवादळामुळे मान्सून २-३ दिवस आधी दाखल होण्याची शक्यता

Subscribe

२ जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस  (Pre-Monsoon)  बसरण्याचा अंदाज

केरळ किनारपट्टीपासून मान्सून अंदाजे २०० वर किलोमीटर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तौक्ते आणि यास चक्रीवादळामुळे केरळमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मान्सून २-३ दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. ३१ मे किंवा १ जून पर्यंत मान्यून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Weather Alert: Monsoon likely to arrive 2-3 days earlier due to cyclone) मान्सून गुरुवारी बंगाल उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या मान्सून मालदीव आणि कोमोरिनच्या काही भागात सक्रिय होत असल्याचा अंदाज आहे. हिच परिस्थिती आणि मान्सूनची गती कायम राहिली तर ३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. २ जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस  (Pre-Monsoon)  बसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उन्हाळ्याने हैराण झालेल्या सर्वांना प्री मान्सूनमुळे दिलासा मिळणार आहे.

३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर ९ ते १० जून पर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल व त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळतील, असे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारत व ईशान्य भारतातील काही भागात पावसाच्या संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २०२१मध्ये जून, जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर या केवळ चार महिन्यात १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात ५ टक्के कमी जास्त होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – गडचिरोलीत मोहफुलाची उपजीविकेशी सांगड

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -