राज्यात 29 जानेवारीनंतर येणार थंडीची लाट?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. अशातच राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच, 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. अशातच राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच, 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हीणजे मुंबईतही किमान तापमानात लक्षणिय घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (weather cold wave in Maharashtra)

हवामान विभागाने 26 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, आता नवीन अंदाजानुसार राज्यात पुन्हा थंडी वाढणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून जम्मू-काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. त्याचाच परिणाम हा राज्यावर दिसून येत आहे. पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

तामिळनाडूमध्ये 900 मीटर उंचीवरून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे 29 ते 31 जानेवारी दरम्यान मध्य भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत मुंबईसह कोकण येथे तापमानात घट झाली असून थंडी वाढली आहे. ही थंडी आणखी वाढणार आहे.


हेही वाचा – उत्तर भारतातील ‘या’ राज्यांमध्ये थंडी आणि मुसळधार पावसाचा IMDचा इशारा