घरमहाराष्ट्रराज्यात येणारे चार दिवस पावसाचे

राज्यात येणारे चार दिवस पावसाचे

Subscribe

येत्या तीन ते चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत वर्तवण्यात आलेला आहे. काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. याआधीच हवामान विभागाने राज्यात १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता. प्रामुख्याने मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेला आहे.

- Advertisement -

राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी, वाशीम, बुलढाणा, अकोला यासारख्या भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने गेल्या काही तासांपूर्वी वर्तवला होता. त्यानुसार काही भागात पावसाची चांगली हजेरी लागली आहे. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, बीड, अहमदनगरचा काही भाग, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या भागातही पावसाची गेल्या काही तासात चांगली हजेरी लावलेली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करण्यात आली होती. पनवेल आणि नवी मुंबईतही काही भागात हलक्या सरी गेल्या काही तासात अनुभवायला मिळाल्या आहेत. तसेच मुंबईतही वातावरण काही अंशी ढगाळ राहिले. मुंबईतही गेल्या २४ तासांमध्ये हलक्या सरींचा वर्षाव उपनगरातील काही भागामध्ये झालेला आहे.

यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात राड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी हजेरी लागली आहे. त्यामध्ये विदर्भातील काही भागांचा समावेश आहे. तर मराठवाड्यातही काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. उर्वरीत मॉन्सूनच्या हंगामात या जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मॉन्सून राज्यातील अनेक भागात समाधानकारक असा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -