घर महाराष्ट्र Weather Forecast: ब्रेकनंतर पाऊस करणार पुन्हा बॅटिंग; पुढील 5 ते 6 दिवस...

Weather Forecast: ब्रेकनंतर पाऊस करणार पुन्हा बॅटिंग; पुढील 5 ते 6 दिवस पावसाचे

Subscribe

मागील दोन ते अडीच आठवड्यापासून राज्यात पावसाचा खंड होता. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतित होते. दरम्यान आता पावसाने पुन्हा एकदा परतण्यास सुरूवात केली असून, पुढील पाच ते सहा दिवस पाऊस धो-धो बरसणार आहे.

मुंबई : यंदा आधीच उशिराने सक्रीय झालेल्या मान्सनने शेतकऱ्यांना पुन्हा एकाद आभाळाकडे पाहायला लावले. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच आता हवामान खात्याने आनंद देणारा अंदाज व्यक्त केला. कारण, ब्रेकनंतर सक्रीय झालेला पाऊस पुन्हा एकदा बॅटींग करणार असून, पुढील पाच ते सहा दिवस चांगलाच बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Weather Forecast: Batting will resume after break; Next 5 to 6 days of rain)

मागील दोन ते अडीच आठवड्यापासून राज्यात पावसाचा खंड होता. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतित होते. दरम्यान आता पावसाने पुन्हा एकदा परतण्यास सुरूवात केली असून, पुढील पाच ते सहा दिवस पाऊस धो-धो बरसणार आहे. दरम्यान काही जिल्ह्यात पावसाची शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

या जिल्ह्यात असा बरसणार पाऊस

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्रातील, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस 05 ते 1.5 मि.मी. पाऊस असणार आहे. तसेच, कोकण भागात सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे. 01 मिली मीटर तर काही दिवशी 15 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे.

हेही वाचा : आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेसोबत लढू; बीडच्या सभेत अजित पवारांचे वक्तव्य

मराठवाड्यात पडणार 1.3 मिलीमीटरपर्यंत बरसणार

- Advertisement -

मराठवाडा विभागात धरावी, धाराशिव, हिंगोली, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अल्पशा पावसाचे प्रमाण राहणार आहे. 2 मिली मीटर ते 4 मिलीमीटर पाऊस राहणार आहे. इतर सर्व जिल्ह्यात 0.1 ते 1.3 मिलीमीटरपर्यंत पाऊस राहणार आहे.

हेही वाचा : कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाला अर्धनग्न करत झाडाला ठेवले बांधून; पटोले म्हणाले- हे गुजरात मॉडेल..

मुंबईकर होणार चिंब

गेल्या महिन्याभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह कोकणात जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत पाऊस झाला होता.

- Advertisment -