घरताज्या घडामोडीराज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, पण मान्सून लांबणीवरच!

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, पण मान्सून लांबणीवरच!

Subscribe

आज १६ मे ला महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेले चार दिवस पाऊस बरसत आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात तर काही ठिकाणी, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागानं पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आज राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता

आज १६ मे ला महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर पुण्यातही पावसाचा अंदाज आहे. १६ आणि १७ तारखेला दुपारनंतर आकाश ढगाळ राहून मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मान्सून लांबणीवरच

यंदा मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाऊस यंदा १ जूनऐवजी ५ जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी इकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वळवाचा पाऊस बरसत आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५ ते १७ तारखेपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर १८ तारखेला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील. तर 19 तारखेला कोकण, गोव्यात, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा – औरेया अपघात : एक कप चहाने वाचवले मजुरांचे प्राण, नाही तर….!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -