मुंबई: पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. (Weather Update Ain t Diwali weather Rain will continue in Konkan Madhya Maharashtra today)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पूर्व आणि आग्नेय दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत गोवा, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
रविवारनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शुक्रवारी सांताक्रुझ येथे सर्वाधिक 35.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि यवतमाळ येथे 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
गोवा, केरळ, तमिळनाडूसह देशाची राजधानी दिल्लीमध्येही ऐन दिवाळीत वरुणराजाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मइळत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही भागात शनिवारी पावासाची रिमझिम पाहायला मिळाली.
या भागात बर्फवृष्टीचा अंदाज
देशभरात गुलाबी थंडी जाणवत आहे. काही भागात मात्र, ऊन पावसाचा खेळ कायम आहे. महाराष्ट्रासह दिल्ली पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईसह दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली असं वायू प्रदूषणातदेखील घट झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस वातावरण थंड राहील. आयएमडीने आज रविवारी उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(हेही वाचा: पोलिसांना बाजुला ठेवा आणि या; उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान )