घरमहाराष्ट्रWeather Update: राज्यात पुढील चार दिवस अवकाळी; 'या' भागांत वादळी पावसाचा अंदाज

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस अवकाळी; ‘या’ भागांत वादळी पावसाचा अंदाज

Subscribe

राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे

मुंबई: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भातील ब्रहृ्पुरी, मालेगाव, मध्य महाराष्ट्रतील जेऊर आणि सोलापूर या शहरांमधील तापमान 42 अंशांच्या वर गेलं आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 5 एप्रिलपासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather Update Bad weather for the next four days rain Forecast)

5 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी उप्षणतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेही लाट येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात पावसाची शक्यता

4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. 4 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थितीची शक्यता आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

हवामान विभादाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

असं असेल मुंबईचं हवामान

पुढील 24 तासांसाठी मुंबईत हवामान कसं असेल याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा अंदाज पाहता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. शहर आणि उपनगरात आकाश निरक्ष्र राहील. मुंबईसह उपनगरात कमाल 34oC आणि किमान तापमान 23oC च्या आसपास राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -