घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरWeather Update : महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता, उत्तरेत...

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता, उत्तरेत थंडीचा जोर वाढणार

Subscribe

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेत थंडीचा जोर वाढणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशातील वेगवेगळ्या राज्यातील हवामानवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेत थंडीचा जोर वाढणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. वीकेंडच्या या पावसानंतर देशात थंडीचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Weather Update: Chance of rain next 24 hours in ‘this’ area of ​​Maharashtra, cold will increase in North India)

हेही वाचा… Bharat Rice : अवघ्या 29 रुपये किलोने मिळणार ‘हा’ तांदूळ 

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा देशाच्या हवामानावर परिणाम दिसून आला आहे. उत्तरेत थंडीचा जोर सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यात हवामानामध्ये कोरडेपणा वाढू लागल्याने महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसायला लागला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असून त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी-जास्त होत आहे.

तर, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी बरसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्स आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभाव यामुळे पुढील आठवड्यात राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात 5 फेब्रुवारीपासून तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. किमान तापमान सुमारे चार अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारनंतर हवामान कोरडे आणि आकाश मुख्यतः निरभ्र राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याशिवाय, उत्तर भारतात आज आणि उद्या जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थानमध्ये तसेच उत्तर मध्य प्रदेशात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातही आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -