घरमहाराष्ट्रWeather Update : 'या' जिल्ह्यात आज पावसाची शक्यता, काही ठिकाणी यलो अलर्ट

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता, काही ठिकाणी यलो अलर्ट

Subscribe

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी पुढील तीन दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये हवामानात विविध बदल पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतातील थंडीची लाट आता कमी होऊ लागली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी पुढील तीन दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. आजपासून दोन ते तीन दिवस म्हणजेच 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Weather Update : Chance of rain today in ‘this’ district, yellow alert in some places)

हेही वाचा… मीरा-भाईंदरमध्ये मराठा सर्वेक्षण योग्यरित्या न केल्याचा आरोप

- Advertisement -

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून माहिती देत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्याची शक्यता आहे. तर, आज विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता डॉ. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.

विजेच्या कडकडाटासोबतच 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही हवामान तज्ज्ञ डॉ. होसाळीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे हिवाळ्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढील तीन दिवस या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत आज शनिवारी (ता. 10 फेब्रुवारी) हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. देशाची स्थिती पाहता पुन्हा एकदा हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेची थंडी आणि दिवसा कडक ऊन असा काहीसा अंदाज आहे. थंडीची लाट कायम असली तरी लोकांना थंडी कमी जाणवू लागली आहे. दरम्यान, हवामान खात्याचे म्हणणे आहे की मध्य भारतात 10 ते 13 फेब्रुवारी आणि पूर्व भारतात 13 ते 15 फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -