Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रWeather Update : यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका

Weather Update : यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका

Subscribe

यंदा नोव्हेंबरमध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. तीन दिवसांपासून अनेक शहरांचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे. तसेच पुढील दोन दिवस किमान तापमान खाली राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

मुंबई : सध्या मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा घसरल्याचे दिसून येत आहे. सहसा डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण वाढायला सुरुवात होते, त्यांनतर हळुहळु थंडीचे प्रमाण वाढत जाते. मात्र यंदा नोव्हेंबरमध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यभरात उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांपासून अनेक शहरांचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे. तसेच पुढील दोन दिवस किमान तापमान खाली राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. तेथील बऱ्याच जिल्ह्यांचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. (Cold will increase in entire.)

हेही वाचा : Eknath Shinde : फडणवीस अन् अजितदादांचे हसरे चेहरे, शिंदेंचा चेहरा गंभीर; अडीच तासांच्या बैठकीनंतर काळजीवाहू ‘CM’ म्हणाले…

- Advertisement -

तसेच मुंबईच्या तापमानात अजून दोन दिवसांनी वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. दक्षिण भारतातील चक्रीवादळामुळे  या तापमानात वाढ झाल्याची दिसून येत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच काही दिवसात थंडीचा जोर कमी होऊन 7 डिसेंबरनंतर पुन्हा तो खाली घसरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : विधानसभेचे निकाल मान्य नसले तरी…; मुख्यमंत्रि‍पदाबाबत काय म्हणाले राऊत?

- Advertisement -

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली असून, हवेत चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. शहरातील वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा नोव्हेंबरमध्येच मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील शहरी भागांत तापमानाचा पारा खाली गेल्याने नागरिकांना एरवी दुर्मिळ असलेल्या गुलाबी थंडीचा अनुभव नोव्हेंबरमध्ये येतोय. गेल्या आठवड्यापासून जवळपास रोज रात्रीच्या तापमानात घट झालेली दिसून येत आहे. यंदा डिसेंबर, जानेवारीबरोबरच फेब्रुवारीतही कमी अधिक प्रमाणात हिवाळा अनुभवता येईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील तापमान

अहिल्यानगर 9.50

पुणे 9.80

बारामती 10.20

नाशिक 10.50

उदगीर 10.50

जळगाव 11.20

परभणी 11.50

धाराशिव 11.50

सातारा 12.40

सोलापूर 12.50

सांगली 14.60

कोल्हापूर 14.90

माथेरान 15.10

डहाणू 17.30

मुंबई 18.70

रत्नागिरी 20.20

ठाणे 21.40


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -