Weather Update: उत्तर कोकणात वाहणार धुळीचे वारे, राज्यात थंडीचा पारा घसरणार – IMD

मुंबई आणि ठाण्यात सुमारे 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे वाहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील थंडीचा पारा देखील चांगलाच घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये थंडीचा पारा चांगलाच घसरला असून कमाल तापमान हे 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

Weather Update dust storms in North Konkan and mumbai, cold mercury will fall in the state - IMD
Weather Update: उत्तर कोकणात वाहणार धुळीचे वारे, राज्यात थंडीचा पारा घसरणार - IMD

पाकिस्तानमधून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून याचा फटका आता उत्तर कोकण आणि मुंबईला बसणार आहे. मुंबई, ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यात सुमारे 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे वाहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील थंडीचा पारा देखील चांगलाच घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये थंडीचा पारा चांगलाच घसरला असून कमाल तापमान हे 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

राज्यात एकीकडे धुळीचे वादळ भोंगावत आहे तर राज्यातील अनेक भागात तापमानात देखील मोठी घट झाली त्याचप्रमाणे गेल्या 24तासात राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस देखील कोसळला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. राज्यावर सध्या अवकाळी पाऊस, थंडी आणि धुळीच्या वादळाचे सावट पहायला मिळत आहे.

पाकिस्तानच्या कराची येथून गुजरातच्या दिशेने मुंबईत आलेल्या धुळीच्या वादळामुळे रविवारी सकाळपासूनच मुंबईसह अनेक भागात मळभ आणि धूळ दिसून येत होती. धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता कमी झाली असून मुंबई पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात श्वसनाचे विकार वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत आज सोमवारी देखील सकाळी ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात धुक्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत रविवारी हवेची गुणवत्ता पातळी चांगलीच खालवल्याचे पहायाला मिळाले. मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 इतका होता. मालाड आणि माझगाव भागात हा निर्देशांक 300 इतका नोंदवला गेला. मालाडमध्ये 316 एक्सूआय तर माझगावमध्ये 315 एक्यूआय होता.


हेही वाचा – Weather Forecast : मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता